Shelkewadi  Development  Village Kolhapur Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

एक  न्यारं गाव ; त्याचं शेळकेवाडी नाव

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर :  गावात ६५ उंबरे, पैकी ६० कुटुंबांचे आडनाव शेळके. पूर्ण गाव व्यसनमुक्त, तंटामुक्त, सेंद्रिय शेतीचा ध्यास घेतलेले. बहुतेक घरांत गोबरगॅसचा वापर. गावातील अनेक घरांचा रंग पिंक. प्रत्येक घर महिलेच्या नावावर. प्रत्येक दारात तुळस. कुटुंबप्रमुख महिला. घराच्या दर्शनी भागावर मिळकत क्रमांक, कुटुंबप्रमुख म्हणून महिलेचे नाव, त्याखाली कुटुंबातील सदस्य संख्या. हे सर्व पाहायला मिळते पर्यावरणपूरक असलेल्या वाशीपैकी शेळकेवाडी (ता. करवीर) येथे.

कोल्हापूरपासून दहा-पंधरा किलोमीटरवरील या गावाचा नवीन वर्षात आणखी कायापालट होणार आहे. येथील महिला आर्थिक, सामाजिक क्षेत्रात आणखी सक्षम होणार आहेत. यासाठी त्यांना परदेशातून हातभार लागणार आहे. याची सुरवात झाली आहे.
हनुमान मंदिरासमोरील देव गल्ली, उभी गल्ली, आडवी गल्ली अशा तीन गल्लीत हे गाव विसावलेले आहे. कोल्हापूर-राधानगरी रोडवरील वाशीजवळ या गावाचा फाटा आहे. २००४ पासून हे गाव चर्चेत आले. ग्रामस्वच्छता अभियान, यशवंत ग्रामस्वच्छता अभियान, गृहस्वामिनी योजनेत गावाने क्रमांक मिळविले.

 गावत प्रत्येक घराला एकत रंग

दर शनिवारी प्रत्येक गावकरी स्वच्छता अभियानात सहभागी होत होता. त्यातून गाव स्वच्छ झाले.  हागणदारीमुक्त झाले. गावात प्रत्येकाने गोबरगॅस तयार केले. क्वचितच एलपीजी गॅस वापरला जातो. गावाच्या एकजुटीसाठी प्रत्येक घराला पिंक रंग दिला होता. आजही उभ्या गल्लीत याची झलक पाहावयास मिळते. महिलांना स्वावलंबी बनविणारे हे गाव आज पर्यावरणपूरक गाव म्हणून प्रसिद्ध आहे. 

या गावात महिलांना सन्मान 
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांना स्थान देणारे हे गाव नव्या विचारांची पेरणी करत आहे. कणेरी मठावरील काडसिद्धेश्‍वर महाराजांच्या पुढाकारातून हे गाव वेगळ्या विचाराचे बीज पेरत आहे. घराघरांत सुविचारांतून विचार रुजविले जात आहेत. गावाला वेगवेगळ्या राज्यातील पर्यटक, आमदार, खासदार, अभ्यासकांनी भेटी दिल्या आहेत. माजी सरपंच जयसिंगराव कृष्णात शेळके ऊर्फ जे. के. त्यांची पत्नी, गावकरी आजी-माजी पदाधिकारी यांचाही मोठा सहभाग आहे.


बचत गटातून शेती
महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांनी गावात इतर गावांतील शेतमजूर आणणे बंद केले आहे. बचत गटातील महिला एकमेकींच्या शेतात जाऊन कामे करतात. सेंद्रिय शेतीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. गावात प्लास्टिकमुक्ती केली आहे. त्या आणखी सक्षम बनण्यासाठी जगभर फिरलेल्या, अधिक काळ अमेरिकेत वास्तव्य केलेल्या प्रगीता यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या सध्या कोल्हापुरात स्थायिक झाल्या आहेत. त्यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या महिलांना वेगवेगळे उत्पादन तयार करण्याचे प्रशिक्षण देत आहेत.

फॉरेस्ट शेतीवर आली झेंडूची फुले
प्रगीता पहवा यांचे भाऊ अमेरिकेत असतात. त्यांनी गावाला भेट दिल्यावर शाळा परिसरात पडलेली लाकडे, कचरा, खत, माती गोळा करून त्यांनी शाळेच्या मागील बाजूस लाकडावरील शेती केली आहे. आकाराने छोटी आहे; मात्र जमिनीवर लाकडाच्या साहाय्याने शेती कशी करावी, याचे हे उदाहरण आहे. सध्या तेथे दीड-दोन फुटांची झेंडूच्या फुलांची झाडे आली आहेत.

या गावाचे वेगळेपण
  गावात बापलेकांची एकाच वेळी कायद्याची पदवी
  संग्राम शेळके यांचा अत्याधुनिक गोठा
  गावात चार्टर्ड अकाऊंटंट आहे, दोघे सैन्यात
  काही जण वेगवेगळ्या पदांवर आहेत
  एक तरुण अमेरिकेत
  शाळेची सजावट इनरव्हील रोटरीतर्फे झाली आहे
  अधिकारी विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडून शाळेला पियानो भेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police : घराचा धागा पुन्हा जुळला; पोलिसांनी तरुणीला दिला मायेचा आधार

...तोपर्यंत नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही, बाळ्या मामांचा सरकारला इशारा, नेमकी अट कोणती?

Latest Marathi News Updates Live: बीडमध्ये हुंडाबळी प्रकरणात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

Asia Cup 2025: 'बुमराह जर UAE विरुद्ध खेळला, तर आंदोलन करेल', माजी भारतीय क्रिकेटपटूने कंल जाहीर

Yermala Crime : राष्ट्रीय महामार्गावर दिवसाढवळ्या वाहन लुटीच्या व्हायरल व्हिडीओ नंतर, स्थानिक गुन्हे शाखेला जाग

SCROLL FOR NEXT